आपल्या देशाने काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अथवा देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिवस साजरा केला. या 75 वर्षांच्या प्रदीर्घ काळात भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. तसेच या काळात आपल्या या लोकशाही असलेल्या देशाला अनेक मोठे नेतेही मिळाले आहेत. भारताच्या या अमृत महोत्सवानिमित्त एका हिंदी वृत्त वाहिनीने एक सर्वेक्षण केले आहे. यात, राजकीय क्षेत्रापासून ते अर्थ व्यवस्था आणि खेळ ते मनोरंजनापर्यंत अनेक विषयांवर लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातच, स्वतंत्र्य भारतातील प्रसिद्ध राजकीय चेहरा अथवा नेता कोण? अशा आशयाचा प्रश्नही विचारण्यात आला. तसेच सर्वात लोकप्रीय पंतप्रधान कोण? असा प्रश्नही या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता.
सर्वात मोठा राजकीय चेहरा कोण? झी न्यूजने केलेल्या या सर्वेक्षणात सर्वात मोठा राजकीय चेहरा अथवा नेता कोण? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतंत्र्य भारतातील सर्वात मोठा चेहरा अथवा नेता असल्याचे म्हटले आहे. तसेच तब्बल 28 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. यानंतर, देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू, इंदिरा गांधी आणि सरदार पटेल, हेदेखील देशातील एक मोठा चेहरा होते, असे लोकांनी म्हटले आहे.
काय म्हणतायत लोक? - 28 टक्के लोक नरेंद्र मोदींना स्वतंत्र्य भारतातील सर्वात मोठा चेहरा अथवा नेता मानतात, 11टक्के लोक जवाहर लाल नेहरू यांना मानतात, 11टक्के लोक इंदिरा गांधी यांना मानतात, 11टक्के लोक वल्लभ भाई पटेल यांना मानतात, तर याशिवाय शेख अब्दुल्ला - 7टक्के, लाल बहादुर शास्त्री - 6टक्के, अटल बिहारी वाजपेयी - 6टक्के, ज्योती बसू - 4टक्के, भीमराव अंबेडकर - 3 टक्के, कांशीराम- 2टक्के, लालू यादव- 2टक्के. याशिवाय, इतर (NTR,JP, बीजू पटनायक) यांना 8टक्के लोक मोठा चेहरा मानतात.
75 वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान कोण? असा प्रश्न विचारला असता, तब्बल 33 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी, असे म्हटले आहे. हे लोक मोदींना सर्वाधिक प्रसिद्ध पंतप्रधान मानतात. यानंतर नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचा क्रमांक लागतो. तब्बल 33.0 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान मानतात. यानंतर जवाहरलाल नेहरू - 13.0टक्के लोक, लाल बहादुर शास्त्री- 13.0टक्के लोक, इंदिरा गांधी- 12.0टक्के लोक, अटल बिहारी वाजपेयी - 8.0टक्के लोक, राजीव गांधींना - 8.0 टक्के लोक तर पी व्ही नरसिंह राव यांना 5.0टक्के लोक लोकप्रीय पंतप्रधान मानतात.
या सर्वेक्षणात देशभरातून 5 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेमध्ये CAPI आणि CAWI रिसर्च पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.