नवी दिल्ली: तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर बुधवारी कोसळले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हेलिकॉप्टरमधील 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश आहे.
मधुलिका यांनी डीयूमधून शिक्षण घेतले
हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले होते. 2016 मध्ये जनरल रावत लष्करप्रमुख झाले तेव्हा मधुलिकाला आर्मी वुमन वेल्फेअर असोसिएशन(AWWA) चे अध्यक्षपद स्वीकारण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासह अनेक सामाजिक कामे केली. जनरल बिपिन रावत यांना दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव कृतिका रावत आणि दुसरीचे तारिणी आहे.
शहडोलमध्ये आहे माहेरसीडीएस बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे माहेर शहडोल येथील सोहागपूर येथे आहे. या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. मधुलिका रावत अखेरच्या 2012 मध्ये त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. ही माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर दःखाचा डोंगर कोसळला आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर
मधुलिका रावत सैनिकांच्या पत्नींना सशक्त बनवणे, त्यांना शिलाई करणे, विणणे आणि पिशव्या बनवणे, तसेच ब्युटीशियनचे कोर्सेस घेणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे काम करत होत्या.. त्या बुधवारी पती सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासोबत कुन्नूरच्या वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होत्या. त्यानंतर त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. जनरल बिपिन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी देशातील पहिले CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली.