शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बरेच दिवस उलटूनही अजून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाही. यावरून आम आदमी पक्षाने(आप) भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

या बैठकीनंतर आपने भाजपवर निशाणा साधला. १० दिवस उलटून गेले, दिल्लीत नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मागील भाजप सरकारप्रमाणेच पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील आणि दिल्लीत अस्थिर सरकार स्थापन होईल. त्यामुळे आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि निवडणुकीत भाजपद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडेल, असे आपने म्हटले आहे.

माजी मंत्री आणि आपचे नेते गोपाल राय यांनी बैठकीत सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील जनतेने आपला ४३ टक्के आणि भाजपला ४५.६ टक्के मते दिली. दिल्लीत भाजपने उघडपणे निवडणूक आयोगाचे उल्लंघन केले, त्यामुळे भाजपला आप पेक्षा २ टक्के जास्त मते मिळाली. तरीही दिल्लीतील जनतेने केजरीवाल आणि आपवरील दबाव नाकारला आणि ४३ टक्के मतदारांनी ते केजरीवालांसोबत असल्याचे दाखवून दिले. ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.

पुढे गोपाल राय म्हणाले, १० दिवस उलटून गेले आहेत आणि भाजप दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल? हे ठरवू शकत नाही. त्यांच्याकडे कालही मुख्यमंत्री नव्हता आणि आजही नाही. पंतप्रधान परदेशातून परतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपने म्हटले. परंतु आता एकामागून एक तारखा दिल्या जात आहेत. यावरून असे दिसून येते की, जेव्हा पहिल्यांदा सत्ता बदलली होती, तेव्हा ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले होते.

दिल्लीला पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलताना दिसत आहेत. दिल्लीत अस्थिर सरकार राहील. अशा परिस्थितीत आपला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आप सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. तसेच, आज आम्ही संघटनेची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोपाल राय यांनी सांगितले.

नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीलादरम्यान, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली