शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण होणार? डीके शिवकुमार यांनी दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 4:07 PM

कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल, असे डीके शिवकुमार म्हणाले. 

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 140 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार (DK Shivkumar) यांनी केला. तसेच, पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल सांगितले. कर्नाटकातील विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग मोकळा होईल. कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल, असे डीके शिवकुमार म्हणाले. 

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस विजयी स्थितीत आहे. मात्र, यावेळीही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. डीके शिवकुमार म्हणाले की, "माझ्यासाठी पक्ष आधी येतो आणि मुख्यमंत्रीपद नंतर येते. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर पक्ष जो काही निर्णय घेईल, तो त्यांना मान्य असणार आहे. कर्नाटक काँग्रेसमधील मतभेदाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्व एकसंध आहे, हे सत्य आहे. कार्यकर्ते सक्रिय आहेत. काँग्रेसला बहुमत मिळावे यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत."

डीके शिवकुमार यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस कर्नाटकात मेहनत घेत आहे. कर्नाटकात 'भारत जोडो यात्रा' यशस्वी झाली. या निवडणुकीत काँग्रेसला 141 जागा मिळतील आणि भाजप 60 जागांच्या खाली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कर्नाटकची निवडणूक आम्ही अगदी आरामात जिंकू. 1978 मध्ये देशात जनता पक्षाची सत्ता असताना, त्यावेळीही कर्नाटकने काँग्रेसचा लोकसभेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला होता. पुन्हा एकदा कर्नाटक तशीच भूमिका बजावणार आहे, असे डीके शिवकुमार म्हणाले.

डीके शिवकुमार यांचा गंभीर आरोपयाचबरोबर, भाजप सरकार आमच्या तरुणांना नोकऱ्या देऊ शकले नाही, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला. भाजप जनतेला महागाईतून दिलासा देऊ शकली नाही. आता ते चिथावणीखोर गोष्टी बोलून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने दिलेल्या यूसीसी आणि एनआरसीच्या आश्वासनांबाबत ते म्हणाले की, कर्नाटक निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जात आहे. या निवडणुकीत भाजपला कोणतेही भाषण करण्यात अपयश आले आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस