शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

कोण ठरणार म्हाडाचे भाग्यवान विजते ? २ हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार ८११ अर्ज  

By सचिन लुंगसे | Published: October 07, 2024 8:17 PM

MHADA Lottery: म्हाडाच्या लॉटरीमधील २ हजार ३० घरांच्या किमतींवर सर्वच स्तरांतून टिका झाल्यानंतर प्राधिकरणाने या घरांच्या किमती केल्या. आता याच घरांची लॉटरी आज (मंगळवार) सकाळी १०.३० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढली जाणार आहे.

मुंबई  - म्हाडाच्या लॉटरीमधील २ हजार ३० घरांच्या किमतींवर सर्वच स्तरांतून टिका झाल्यानंतर प्राधिकरणाने या घरांच्या किमती केल्या. आता याच घरांची लॉटरी आज (मंगळवार) सकाळी १०.३० वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढली जाणार आहे. या घरांसाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज आले आहेत. म्हाडाच्या लॉटरी सहभाग घेतलेल्या अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.

'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून आहे. वेबकास्टिंगची लिंक https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर आहे. थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच निकाल जाणून घेता येणार आहे. विजेत्या अर्जदारांची यादी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे. लॉटरी विजेता ठरल्यानंतर अर्जदारास  सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. १,३४,८११  अर्जदारांनी अर्ज सादर केले. मात्र त्यापैकी १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. लॉटरी विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आले.नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये १३२७ सदनिकांचा समावेश आहे.दुसर्‍या गटामध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३(५ ),(७), ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांचा समावेश आहे.तिस-या गटांतर्गत मागील लॉटरीतील विविध वसाहतीतील ३३३ सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील ३५९ सदनिकांकरीता ४७,१३४ अर्ज आले आहेत.अल्प उत्पन्न गटातील ६२७ सदनिकांकरीता ४८,७६२ अर्ज आले आहेत.मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिकांकरीता ११,४६१ अर्ज आले आहेत.उच्च उत्पन्न गटातील २७६ सदनिकांकरीता ६४५४ अर्ज आले आहेत. नेहरू नगर, कुर्ला या योजनेतील १४ सदनिकांकरीता ३१२४ अर्ज आहेत.ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरीता ५४६ अर्ज आहेत.सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील २ सदनिकांकरीता ६०२ अर्ज आहेत.कन्नमवार नगर, विक्रोळी या योजनेतील २ सदनिकांकरीता ४४६ अर्ज आहेत.भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता ४२२ अर्ज आहेत.शिवधाम जुनी दिंडोशी,  म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील एका सदनिकेकरिता २९१ अर्ज आहेत.शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील ४५ सदनिकांकरीता ९,५१९ अर्ज आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणा-या लॉटरीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :mhadaम्हाडाMumbaiमुंबई