कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण ठरवणार? काँग्रेस आमदारांकडून एकमताने एका ओळीचा ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:16 PM2023-05-14T21:16:15+5:302023-05-14T21:17:05+5:30
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात खुर्चीसाठी स्पर्धा आहे. खर्गे यांनी बैठकीपूर्वी दोघांचीही वेगळी बैठक घेऊन चर्चा केली.
कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा आजच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत कोण ठरवणार यावर एकमताने निर्णय झाला आहे. काँग्रेस आमदारांनी एकमताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे हा निर्णय़ सोपविला आहे. तसा ठराव पास करण्य़ात आला आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात खुर्चीसाठी स्पर्धा आहे. खर्गे यांनी बैठकीपूर्वी दोघांचीही वेगळी बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये त्यांनी दोघांचीही मते जाणून घेतली. यानंतर निरीक्षकांनीही काँग्रेसच्या आमदारांची मते जाणून घेतली आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे बंगळुरुला गेले आहेत. त्यांत्यासोबत आणखी दोघे आहेत.
काँग्रेसच्या आमदारांची बैठक बंगळुरूतील शांग्रीला हॉटेलमध्ये सुरु आहे. तिथे आमदारांनी एकमताने एका ओळीचा प्रस्ताव पास केला आहे.
Resolution copy of Congress CLP meeting
— ANI (@ANI) May 14, 2023
Congress Legislature Party has unanimously decided to leave the selection of Congress Legislature Party leader to the decision of the AICC President
#KarnatakaElectionResults2023pic.twitter.com/74tpAcTrsn
यादरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 18 मे रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. सोनिया गांधीं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, काँग्रेसकडून समविचारी पक्षांनाही निमंत्रणे पाठवली जाणार आहेत.