नवी दिल्ली - एनडीए सरकार स्थापनेच्या प्रयत्नांमध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत राज्यांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत सभापतींच्या भूमिकेचे महत्त्व लक्षात घेता केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये या पदावरून ताणाताणी होण्याची शक्यता आहे.
सभापतीपद का महत्त्वाचे आहे?- शिस्त लावण्याचे काम केले जाते- शिस्त मोडल्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार- सदस्यास अपात्र ठरविण्याचा अधिकार- बहुमत चाचणी दरम्यान मत निर्णायक असते.- अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार.- विरोधी पक्षनेत्यास मान्यता देण्याचा अधिकार- समिती अध्यक्षांची नियुक्ती.
मित्रपक्षांचे झालेले सभापती- अध्यक्ष पक्ष सरकार - जीएमसी बालयोगी टीडीपी एनडीए- मनोहर जोशी शिवसेना एनडीए - सोमनाथ चॅटर्जी सीपीएम यूपीए'
...अन् एका मताने पडले वाजपेयी सरकार१९९८च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर मित्रपक्ष तेलुगू देसमच्या जीएमसी बालयोगी यांची लोकसभाध्यक्षपदी निवड झाली. विश्वासदर्शक ठरावादरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री गिरधर गेमांग यांना मतदानाची परवानगी दिली. गेमांग यांनी अद्याप लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. गेमांग यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले आणि एका मताने सरकार पडले.