शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 5:28 AM

नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे.

बंगळुरू : इस्रोने भारताचे चंद्रयान-३ आणि रशियाचे लुना-२५ पुढील आठवड्यात चंद्रावर उतरण्याच्या तयारीत असून, दक्षिण ध्रुवावर अगोदर पोहोचण्यासाठी दोन्ही देशांत जोरदार स्पर्धा लागली आहे. दोघांच्या लँडिंगच्या तारखा, लुना-२५ साठी २१ ते २३ ऑगस्ट आणि २३-२४ ऑगस्ट अशा जवळ असून, नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे.

‘चांद्रयान-३’ चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचण्यास लागले २२ दिवस

चांद्रयानासाठी १७ ऑगस्ट खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी इस्रो ‘चांद्रयान-३’चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल व २३ ऑगस्ट रोजी लँडिंग होईल. चांद्रयानमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. लँडर व रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्साराचा अभ्यास करेल. लँडर  व रोव्हर चंद्रावर पाण्याचा शोध घेतील.

१०० किमी कक्षेत लुना-२५ मॉस्को : रशियाचे लुना-२५ हे यान चंद्राच्या १०० किमीच्या कक्षेत पोहचण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. रशियाने ४७ वर्षांनंतर चंद्रावर आपली मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या आहेत. चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन बर्फाचे अस्तित्व शोधणे, दक्षिण ध्रुवावरील मातीच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास ही या मोहिमेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

लँडिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत आणण्याची प्रक्रिया आणि यान आडव्या स्थितीपासून उभ्या स्थितीकडे नेण्याची प्रक्रिया आहे. यातच क्षमता सिद्ध करायची आहे. - एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो.

 

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चांद्रयान-3