"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:26 PM2024-02-02T16:26:38+5:302024-02-02T16:28:02+5:30
"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..."
निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. "आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण भाजपची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहे,' असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? पीके म्हणाले, त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल.
यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयू यांच्यावरही भाष्य केले. पीके म्हणाले, विरोधकांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी भाजपने नितीश यांना आपल्यासोबत घेतले आहे. भाजपने तर यापूर्वीच जेडीयूला गिळंकृत केले आहे. हे नितीश यांनाही माहीत आहे. मात्र, जे काही शिल्लक आहे, त्याच्या सहाय्याने आणखी काही वेळ त्यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे आहे. ते गत 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्प आहे.
राहुल गांधींच्या यात्रेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह -
प्रशांत किशोर म्हणाले, नरेंद्र मोदी सातत्याने आपली छबी बदलतात, यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. यावेळी पीके यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सातत्याने काँग्रेसला नव्या अवतारात येण्याचा सल्ला देत आलो आहे. ते कधी राफेलबद्दल बोलता तर कधी हिंदुत्वावर बोलतात. असे करून चालणार नाही. तुम्हाला एक मुद्दा घ्यावा लागेल आणि संदेश द्यावा लागेल.