शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 8:29 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील  93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात 66 टक्ते मतदान झाले, 2012 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात चार ते पाच टक्के मतदान कमी झाले. दुस-या टप्प्यात शहरी मतदारसंघ जास्त असून शहरी भागात भाजपाचे ब-यापैकी वर्चस्व आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील  93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात असून दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने भाजपा आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रचार केला आहे. 

9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 66 टक्ते मतदान झाले होते. 2012 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात चार ते पाच टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे दुस-या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल. दुस-या टप्प्यात शहरी मतदारसंघ जास्त असून शहरी भागात भाजपाचे ब-यापैकी वर्चस्व आहे. अहमदाबादच्या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

 

मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. उत्तर गुजरातमध्ये 53 जागा आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे 32 आणि काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. दुस-या टप्प्याच्या मतदानासाठी 25,558 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, युवा नेते अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी या लढतींकडे सगळयांचेच लक्ष लागले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावतील. गुजरातच्या उज्वल भवितव्यांसाठी अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन  राहुल गांधी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठया संख्येने मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवाला समृद्ध करा असे म्हटले आहे. 

 

जागांसाठी मतदान - 93एकूण मतदार - 22296867पुरुष मतदार - 11547435महिला मतदार - 10748977उमेदवार - 851पुरूष- 782महिला- 69

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस