विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान भलेही ४२ अंशांच्या पुढे गेलेले आहे. पण, त्यापेक्षा अधिक तापले आहे ते इथले राजकारण. भाजपचे विद्यमान खासदार, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी हे पुन्हा मैदानात आहेत. तर, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीतून आलेले उम्मेदाराम बेनीवाल यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. येथून अपक्ष आमदार रवींद्रसिंह भाटी यांनी रिंगणात उतरून लढत तिरंगी केली आहे.
बाडमेर हा राजस्थानातील तिसरा सर्वांत मोठा जिल्हा आहे. भाजपने यंदा पुन्हा कैलाश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. आमदार ते खासदार आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री, असा त्यांचा यशाचा चढता आलेख आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे ते राजस्थानचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मात्र, यंदा त्यांच्यासाठी ही निवडणूक आव्हान बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामांमुळे मतदार आपल्याला कौल देतील, असा त्यांना विश्वास आहे.
काँग्रेसचे उमेदवार उम्मेदाराम बेनीवाल हे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बायतू मतदारसंघातून केवळ ९१० मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेस पक्षाचे तिकीट आणि त्यांचा जनसंपर्क या जोरावर ते तगडे उमेदवार म्हणून समोर आले आहेत. रवींद्रसिंह भाटी (२६) यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत शिव मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयही मिळविला होता. रवींद्रसिंह भाटी यांनी लोकसभेसाठी ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- अपक्ष उमेदवार रवींद्रसिंह भाटी यांच्या उमेदवारीचा आपल्याला फायदा होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. तर, भाटी यांना रोखण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय मतदारांची संख्या निर्णायक आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच येथील जाहीर सभेत स्पष्ट केले की, आमच्यासाठी संविधान हेच सर्वस्व आहे. या माध्यमातून मागासवर्गीय मतदारांना आपलेले करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
- पाण्याची समस्या आणि बेरोजगारीचा मुद्दाही येथे चर्चिला जात आहे. पर्यटनालाही येथे पाहिजे तशी चालना मिळालेली नाही.
एकूण मतदार २२,०६,२३७पुरुष - ११,७६,९७५महिला - १०,२९,२५३
२०१९ मध्ये काय घडले?कैलाश चौधरी भाजप (विजयी) ८,४६,५२६मानवेंद्र सिंह काँग्रेस, (पराभूत) ५,२२,७१८
२०१९ पूर्वीची परिस्थिती वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते २०१४ सोनाराम चौधरी भाजप ४,८८,७४७२००९ हरीश चौधरी काँग्रेस ४,१६,४९७२००४ मानवेंद्र सिंह भाजप ६,३१,८५११९९९ सोनाराम चौधरी काँग्रेस ४,२४,१५०