नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी शानदार होती. आणि संपूर्ण देशाला या खेळाडूंवर गर्व आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. कोविंद यांना राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रामध्ये टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय दलाला चहापानासाठी आमंत्रित केले होते.राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार खेळाडूंशी चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला आहे. हे ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारतीय दलाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रर्दशन होते. भारतीय पथकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्ण पदकासह एकूण सात पदके मिळवली आहेत. त्यात दोन रौप्य पदकांचा समावेश आहे.’ त्यांनी पुढे म्हटले की, टोकियोत त्यांनी ज्या कौशल्याचे आणि धैर्याचे प्रर्दशन केले ते प्रभावशाली होते.’ तसेच त्यांनी प्रशिक्षक, सहयोगी स्टाफ आणि खेळाडूंच्या परिवारातील सदस्यांचे कौतुकही केले. यावेळी उपराष्ट्रपदी एम. व्यकंय्या नायडू उपस्थित होते.
पूर्ण देशाला भारतीय ऑलिम्पिक पथकावर गर्व : राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 5:08 AM