शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 12:34 AM

जिंकूनच परत जाणार

शीलेश शर्मा नवी  दिल्ली :  ही  लढाई  आता  केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही.  ही  लढाई  आता  श्रीमंत  आणि  गरीब यांच्यातील आहे,  असे  म्हणणे  आहे  मुरादाबादचे  शेतकरी धर्म  पाल  यांचे.  गत  २८  दिवसांपासून  ते  गाझीपूर सीमेवर आंदोलन  करत  आहेत.  नवे  कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात  आले  आहेत,  असे  सरकार सांगत  आहे.  मात्र, कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार  आहे  हे  सरकारने स्पष्ट करावे,  असे  शेतकऱ्यांचे  मत  आहे.

शेतकऱ्यांचे  असे  म्हणणे  आहे  की, आम्हाला फायदा  नको  आहे.  मग  सरकारकडून  ही  जबरदस्ती  का  केली  जात  आहे.  गाझीपूर सीमेवर केवळ उत्तर  प्रदेशातूनच  नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र  आणि  कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत.  हे  तीन  कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत,  असे  ते  सांगत आहेत. उत्तर प्रदेशातील शेतकरी गुरुदयाल  म्हणतात की, येथे भंडार भरलेले  आहे.  सरकार आम्हाला  कधीपर्यंत  बसून ठेवणार  आहे.  

फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत...

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात  आले  आहेत.  या  तंबूंची  संख्या जवळपास  ५००  आहे.  प्रत्येक तंबूत  २०  ते  २५  शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था  आहे.  महिलांसाठी चारही बाजूने  बंद  एक  मोठा  तंबू  उभारण्यात  आला  आहे.  यात  ५००  महिलांची व्यवस्था करण्यात  आली  आहे.  

कपडे धुण्यासाठी  वॉशिंग  मशिन  आहेत.  जीवनाश्यक  वस्तू मोफत दिल्या  जात  आहेत. येथे रक्तदान  शिबिरेही  होत  आहेत.  औषधांचे  काउंटर  आहे.  ॲम्बुलन्स  तयार आहेत. डॉक्टरही उपलब्ध आहेत.  शीख  समुदायाच्या महिला येथे येऊन भोजन बनविण्यात  मदत  करत  आहेत. सर्वांचा  एकच  सूर  आहे  की, येथून  जिंकूनच  परत  जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत,  तुटणार  नाहीत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी