आज पुन्हा एकदा अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. यामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये घट झाली, यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर आरोप करत सवाल केले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी विरोधी आघाडीच्या 'इंडिया'च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज गुरुवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली.
आता या कंपनीवर अंबानींचा फोकस, फक्त ₹20 आहे शेअरची किंमत! खरेदीसाठी लोकांची झुंबड
ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने अदानी समूहावर केलेल्या आरोपांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, जी-20 बैठकीपूर्वी ही बाब समोर आली असून ही देशाच्या प्रतिष्ठेशी संबंधित बाब आहे. 'देशातून एक अब्ज डॉलर्स कोणाचे पैसे बाहेर पाठवले जातात' हे स्पष्ट व्हायला हवे?, असा सवालही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, सीबीआय आणि ईडी सारख्या एजन्सी गौतम अदानी यांची चौकशी का करत नाहीत?, असा सवालही गांधी यांनी केला. 'सध्याचे वातावरण जी-20 चे आहे. हे जगातील भारताच्या स्थानाबद्दल आहे. भारतासारख्या देशासाठी आपल्या आर्थिक वातावरणात पारदर्शकता आणि व्यवसायात समतल खेळाचे क्षेत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. दोन प्रमुख जागतिक वृत्तपत्रांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत, पंतप्रधानांनी स्वत:ला स्वच्छ सिद्ध करावे. जेपीसीची स्थापना करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.
'पंतप्रधान मोदी अदानी समूहावरील आरोपांची चौकशी का करू देत नाहीत? सेबीच्या तपासात अदानी समूहाला क्लीन चिट देण्यात आली आणि असे करणारे लोक नंतर अदानी समूहाचे कर्मचारी बनले, असा दावाही गांधी यांनी केला.