नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यातील गुणवत्ता यादीत ४४ वा क्रमांक पटकाविण्याबद्दल तुषारकुमार नावाच्या दोन उमेदवारांमध्ये हे स्थान नेमके कोणाचे यावरून वाद सुरू झाला आहे. त्यांच्या प्रवेश कार्डावरील रोल क्रमांकही एकच आहे. दोन तुषारकुमारांपैकी एक हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील, तर दुसरा बिहारमधील भागलपूरचा रहिवासी आहे.
भागलपूरमधील तुषारकुमार याने हरयाणातील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट असल्याचा आरोप केला आहे. भागलपूरच्या तुषारकुमारने बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, तर रेवाडी येथील रहिवासी तुषारकुमार यांनी या प्रकरणी दिल्लीतील यूपीएससीचे कार्यालय गाठले व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)
कफ सिरपची चाचणी बंधनकारकरेवाडी येथील तुषारकुमारचे पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी अभिनंदन केले.अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या तुषारकुमार यांनी यादीत ४४ वा क्रमांक आपल्यालाच मिळाल्याचा दावा केला. बिहारच्या तुषारकुमारने सांगितले की, रेवाडी येथील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट आहे. त्यावर यूपीएससीचा वॉटर मार्क नाही. कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर रेवाडीच्या तुषारकुमारची काहीही माहिती येत नाही, असाही दावा बिहारच्या तुषारकुमारने केला.