Yogi Adityanath Bulldozer, UP Assembly Election 2022 Results मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशातभाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपाला २५०+ जागांवर आघाडी मिळाली आणि उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्षाचं चित्र स्पष्ट झालं. भाजपाला एकहाती बहुमत मिळत असल्याचं दिसताच भाजपा समर्थकांनी विविध प्रकारे आनंद व्यक्त करण्यास सुरूवात केली. कमळ हे भाजपाचं चिन्ह होतं. त्यामुळे समर्थकांच्या हाती कमळ दिसणं अपेक्षित होतं, पण अनेकांच्या हाती बुलडोझरची प्रतिकृती दिसून आल्या. यामागचं कारण काय.. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जाणून घेऊया त्यामागचं कारण.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यात प्रमुख लढती होत्या. त्यामुळे अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. त्यावेळी अनधिकृत बांधकामांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अभय देत असून ते 'बाबा बुलडोझर' आहेत असा आरोप अखिलेश यादवांनी केली. त्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले होते की 'बुडलोडर बोल नाही पण सुरू झाला की काम छान करतो.' त्यानंतर प्रचारसभांमध्ये अनेक वेळा बुलडोझर मुद्द्याचा वापर करण्यात आला. '१० मार्चनंतर (निकालानंतर) बुलडोझर अनधिकृत बांधकामे आणि गुन्हेगारीवर बुलडोझर फिरवला जाईल', असंही योगी म्हणाले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांनी सेलिब्रेशनच्या वेळी बुलडोझरचा वापर केला.
लखनौ येथील पक्ष कार्यालयात एक दीड वर्षांचा चिमुकला योगी आदित्यनाथ यांच्या पेहरावात दिसून आला. विशेष म्हणजे त्याचा हातात बुलडोझर होता. तसेच, विजयाचं सेलिब्रेशन करणाऱ्या एका समर्थकाने थेट डोक्यावर बुलडोझर फिट केला होता. त्यां साऱ्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले.