केवळ 138 रुपयेच का मागतेय काँग्रेस? 1.38 लाख रुपये देत खर्गे म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला'!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:39 PM2023-12-18T14:39:40+5:302023-12-18T14:40:59+5:30
आज काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अभियानाला सुरुवात करत एक विनोदही केला आणि एकच हशा पिकला.
काँग्रेस पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशवासियांना 138 रुपये मागत आहे. हो, हे खरे आहे. यासाठी घर-घर अभियान चालविले जाणार आहे. 'डोनेट फॉर देश' नावाने हे अभियान चालवले जाणार आहे. हे अभियान लॉन्च करण्यात आले असून, यामाधेयमाने काँग्रेस पक्ष लोकांशी जोडला जाईल आणि त्याला निधीही उभारता येणार आहे.
आज काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अभियानाला सुरुवात करत एक विनोदही केला आणि एकच हशा पिकला. झाले असे की, यावेळी बोलताना अजय माकन म्हणाले, काँग्रेस पक्षाला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. मला हे सांगताना अतिशन आनंद होत आहे की, 138 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आज मल्लिकार्जुन खर्गे 1 लाख 38 हजार रुपये डोनेट करत आहेत. हे ऐकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी मागे उभ्या असलेल्या के. सी. वेणुगोपाल यांनी हसत हसत गंमतही केली. जयराम देखील त्यांच्याकडेच बघत होते.' यावर सर्व हसायला लागले. यानंतर माकन म्हणाले, 138, 1380 अथवा 13 लाख 80 हजारचे योगदान काँग्रेस पक्षाचे 138 वर्ष दर्शवतात.
माकन म्हणाले, आमच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दोन दिवसांपूर्वीच परिपत्रकाद्वारे 28 तारखेपासून घरोघरी जाऊन (एका मतदान केंद्रातील किमान 10 घरांना भेटी देऊन) काँग्रेससाठी किमान 138 रुपयांची मदत मागण्यास सांगितले आहे. यानंतर माकन म्हणाले, मी विनंती करतो की, आमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी 'डोनेट आयएनसी डॉट इन' प्रक्रयेअंतर्गत खर्गे यांच्या फोनवरून 1 लाख 38 हजार रुपये काँग्रेसला डोनेट करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
#WATCH | Congress President Mallikarjun Kharge launches 'Donate for Desh' crowdfunding campaign for the party, ahead of 2024 Lok Sabha polls pic.twitter.com/rlhBrQmsZJ
— ANI (@ANI) December 18, 2023
यानंतर लवली आपल्या फोनवर काही तरी करू लागले. त्यांच्या बाजूला खर्गे शांतपणे उभे होते. लवली काही म्हण्यापूर्वीच, काँग्रेसाध्यक्ष खर्गे हसत हसत म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला.' हे ऐकूण सर्वच जण खळखळून हसले. यानंतर काही सेकंदांनंतर, खर्गे यांनी पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि वेणुगोपाल यांनी त्यांना सर्टेफिकीटही दिले.