शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

केवळ 138 रुपयेच का मागतेय काँग्रेस? 1.38 लाख रुपये देत खर्गे म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 2:39 PM

आज काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अभियानाला सुरुवात करत एक विनोदही केला आणि एकच हशा पिकला.

काँग्रेस पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशवासियांना 138 रुपये मागत आहे. हो, हे खरे आहे. यासाठी घर-घर अभियान चालविले जाणार आहे. 'डोनेट फॉर देश' नावाने हे अभियान चालवले जाणार आहे. हे अभियान लॉन्च करण्यात आले असून, यामाधेयमाने काँग्रेस पक्ष लोकांशी जोडला जाईल आणि त्याला निधीही उभारता येणार आहे.

आज काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या अभियानाला सुरुवात करत एक विनोदही केला आणि एकच हशा पिकला. झाले असे की,  यावेळी बोलताना अजय माकन म्हणाले, काँग्रेस पक्षाला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. मला हे सांगताना अतिशन आनंद होत आहे की, 138 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आज मल्लिकार्जुन खर्गे 1 लाख 38 हजार रुपये डोनेट करत आहेत. हे ऐकताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

यावेळी मागे उभ्या असलेल्या के. सी. वेणुगोपाल यांनी हसत हसत गंमतही केली. जयराम देखील त्यांच्याकडेच बघत होते.' यावर सर्व हसायला लागले. यानंतर माकन म्हणाले, 138, 1380 अथवा 13 लाख 80 हजारचे योगदान काँग्रेस पक्षाचे 138 वर्ष दर्शवतात.

माकन म्हणाले, आमच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दोन दिवसांपूर्वीच परिपत्रकाद्वारे 28 तारखेपासून घरोघरी जाऊन (एका मतदान केंद्रातील किमान 10 घरांना भेटी देऊन) काँग्रेससाठी किमान 138 रुपयांची मदत मागण्यास सांगितले आहे. यानंतर माकन म्हणाले, मी विनंती करतो की, आमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी 'डोनेट आयएनसी डॉट इन' प्रक्रयेअंतर्गत खर्गे यांच्या फोनवरून 1 लाख 38 हजार रुपये काँग्रेसला डोनेट करण्याची प्रक्रिया सुरू करावी.

यानंतर लवली आपल्या फोनवर काही तरी करू लागले. त्यांच्या बाजूला खर्गे शांतपणे उभे होते. लवली काही म्हण्यापूर्वीच, काँग्रेसाध्यक्ष खर्गे हसत हसत म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला.' हे ऐकूण सर्वच जण खळखळून हसले. यानंतर काही सेकंदांनंतर, खर्गे यांनी पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि वेणुगोपाल यांनी त्यांना सर्टेफिकीटही दिले.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस