शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

‘डेस्टिनेशन वेडिंग’ विदेशात कशाला? देशातच करावे; पंतप्रधानांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 6:36 AM

Destination Wedding: देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली -  देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. विवाह सोहळे देशातच आयोजित करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असे आावाहन त्यांनी केले. ‘मन की बात’मध्ये ते बोलत होते.

अनेक लोक ‘मेड इन इंडिया’ वस्तूंना प्राधान्य देत आहेत. परंतु, ही मागणी केवळ सणांपुरतीच मर्यादित नसावी. लवकरच लग्नांचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा लग्नसराईमध्ये सुमारे ५ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली. परंतु, देशातील काही कुटुंब परदेशात लग्न करतात. तेच देशात केल्यास देशातील पैसा देशातच खर्च होतील. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग परदेशात न करता देशातच करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हुतात्म्यांना आदरांजलीमोदी यांनी मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, २६ नोव्हेंबरचा दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. अतिरेक्यांनी त्यावेळी केवळ मुंबईच नव्हे, तर देशावर हल्ला केला होता. परंतु, आपला देश दहशतवादाला सामर्थ्याने तोंड देत त्यावर मात करत आला आहे.

बौद्धिक संपदेत प्रगतीबौद्धिक संपदा क्षेत्रात देशाची प्रगती होत असून, २०२२ मध्ये देशात पेटंट मिळविण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले. पेटंटमुळे केवळ देशाच्या बौद्धिक संपदेत वाढ होत नाही, तर त्यातून नवनव्या संधी तयार होतात. स्टार्टअप, नवसंशोधनासाठी विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmarriageलग्नIndiaभारत