भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजू का परत आली आहे, ती कायमची भारतात आली आहे की पाकिस्तानात परतणार आहे? त्यांचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचरांनी अंजूची अनेक तास चौकशी केली. यावेळी तिने काही खुलासे केले. अंजूने सांगितले की, ती २१ जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी नागरिक नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्न केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, सध्या तिच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र नाहीत.
'माझा पाकिस्तानी लष्कराशी संबंध नाही'
आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी संरक्षण कर्मचार्यांसोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण अंजू मात्र आपल्या उत्तरांवर ठाम आहे.
अंजू पतीला घटस्फोट देऊन पुन्हा पाकिस्तानात जाणार
पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. तिने असेही सांगितले की या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या दोन्ही मुले अरविंद सोबत राहतात.