ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक रणजीत सिन्हा यांनी आमच्यावर फक्त इशरत जहाँ चकमक खरी होती की खोटी ? याचा तपास करण इतकीच जबाबदारी होती असं सांगितल आहे. इशरत जहाँचे दहशतवाद्यांशी संबंध होते की नाही हा आमच्या तपासाचा भाग नसल्यांच रणजीत सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे. रणजीत सिन्हा यांच्यावर इशरत जहाँ चकमक प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 'अजमल कसाब आणि अफजल गुरु दहशतवादी आहेत माहित असतानाही त्यांना गोळ्या का घातल्या नाहीत ?' असा सवालही त्यांनी विचारला आहे.
सीबीआयने इशरत जहाँ चकमक खोटी असल्याचं आपल्या आरोपत्रात सांगितलं होत. या आरोपपत्रात गुजरात तसंच गुप्तचर विभागाच्या काही अधिका-यांनी नावेदेखील देण्यात आली होती. सीबीआय कधीच इशरत जहाँच्या दहशतवादी संबंधाविषयी तपास करत नव्हती. जेव्हा न्यायालयीन चौकशीदरम्यान ही चकमक खोटी असल्याचं समोर आलं त्यानंतर आमच्याकडे तपास सोपवण्यात आला होता अशी माहिती रणजीत सिन्हा यांनी दिली आहे.
पिल्लई हे जाणूनबुजून भाजपाला मदत करत असल्याचा आरोप तपासात सहभागी असणा-या काही सीबीआय अधिका-यांनी केला आहे. सीबीआयचे माजी विशेष संचालक के सलीम अली यांनी डेव्हिड हेडलीने इशरत जहाँ प्रकरणी न्यायालयात दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी डेव्हिड हेडलीच्या सांगण्यात तथ्य नसल्यांच , तसंच तो आरोपी असल्याने त्यांचं वक्तव्य ग्राह्य धरलं जाऊ शकत नसल्याचं म्हणलं आहे.