नवी दिल्ली : २ जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाचा समावेश न करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी दबाव आणल्याचा आरोप माजी महालेखापाल विनोद राय यांनी केला आहे. मग त्यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी धाव का घेतली नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राय यांच्या विधानामागे राजकीय उद्देश असून सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले आरोप याआधीच फेटाळण्यात आले असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी स्पष्ट केले. राय यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असून त्यातूनच भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. कॅगने गुजरात सरकारवर ताशेरे ओढले होते, असे असतानाही राय यांनी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवाक्षरही काढलेले नाही, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राय यांनी एफआयआर दाखल का केला नाही
By admin | Published: September 13, 2014 2:07 AM