नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षामध्ये ८ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपला देश सोडून का जात आहेत, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. यामागे प्रमुख कारण आहे सुखसुविधा तसेच दर्जेदार राहणीमान. हे ज्या देशांमध्ये आहे, त्या देशांची वाट भारतीयांनी धरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
८.३४ लाख भारतीयांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व सोडले.
कोणत्या देशांमध्ये जात आहेत भारतीय? बहुतांश भारतीय हे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, यूएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती देत आहेत.
परदेशात स्थायिक होण्याची कारणे काय?
चांगले राहणीमान परदेशात राहणीमान चांगले आहे. शिक्षण दर्जेदार आहे. याशिवाय आरोग्य व इतर सुविधादेखील चांगल्या असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे.
भरघोस पगार रोजगाराच्या चांगल्या संधी आणि भरघोस पगार, यासाठीही भारतीय इतर देशांत जात आहेत. कामाचे निश्चित तास तसेच नियम व कायद्यांचे काटेकोर पालन होते, अशा देशांना भारतीय पसंती देत आहेत.
करसवलती अनेक देशांमध्ये बरीच कर सवलत मिळते. कररचनाही वेगळी असते. व्यवसायासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे अशा देशांमध्ये स्थायिक होण्यास भारतीय प्राधान्य देत आहेत.
मजबूत पासपोर्ट भारतीय पासपोर्टवर ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. मात्र, यापेक्षा मजबूत पासपोर्ट असलेल्या देशांना प्राधान्य दिले जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, यूएई, ऑस्ट्रेलिया आदींचा यात समावेश आहे.