नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सुमारे ४ तास युक्तिवाद केला. विवाहासारख्या संस्थेसाठी दोन भिन्न लिंगांचे जोडीदार असणे आवश्यक आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केला.
तिसऱ्या दिवसाच्या सुनावणीचा समारोप करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूचा युक्तिवाद कोणत्याही परिस्थितीत सोमवारी संपणार असल्याचे सांगितले. गुरुवारच्या सुनावणीत अभिषेक मनु सिंघवी यांनी विशेष विवाह कायद्याचा नियम चुकीचा असल्याचे म्हटले. ‘कोणासोबत राहायचे, हा फक्त माझा (याचिकाकर्त्यांचा) निर्णय असेल. हा माझ्या मनाचा निर्णय असेल. मी कोणासोबत आणि किती काळ जगायचे, हा माझा अधिकार आहे,’ असे ते म्हणाले.
लग्नाच्या संकल्पना नव्याने कराव्या लागतीलnचंद्रचूड म्हणाले, अशा संबंधांना गुन्हेगार श्रेणीतून काढलेच नाही, तर हेसुद्धा सांगितले की, समलिंगी जोडपे स्थिर संबंधातही राहू शकतात. nआता लग्नाच्या बदलत्या धाेरणांची नव्याने व्याख्या करावी लागेल. लग्नासाठी वेगवेगळ्या लिंगांचे दोन जोडीदार असणे आवश्यक आहे का? येथे कायदा विवाहासाठी दोन भिन्न लिंग असू शकतात हे ओळखण्यास सक्षम आहे, परंतु विवाहाच्या व्याख्येसाठी हे आवश्यक नाही.”