संतोष ठाकूर नवी दिल्ली : डेटा लीक, डाटाची सुरक्षितता व खासगीपणावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) मोठे पाऊल उचलले आहे. ट्रायने अॅप डाऊनलोडसाठी आवश्यक रूपात मिळवण्यात येणाऱ्या संमतीसाठी नियम बनवण्याचे ठरवले आहे.जेव्हा कोणी अॅप डाऊनलोड करतो तेव्हा त्याच्याकडे सगळ््या डेटापर्यंत प्रवेश मागितला जातो, हे चुकीचे असून त्याबाबत लवकरच कन्सल्टेशन पेपर (सल्ला पत्र) आणले जाईल, असे ट्रायचे म्हणणे आहे. या विषयावर सर्व संबंधितांकडून मते मागवून त्यानंतर नियम बनवले जातील.ट्रायकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या की जेव्हा आम्ही अॅप लाऊनलोड करतो तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टबरोबर आपली फोटो गॅलरी, तुमचे एसएमएस व आपल्या ईमेलसह इतरही डाटापर्यंत देण्यास सांगितले जाते. त्याला नकार दिला तर अॅप डाऊनलोड होत नाही. आम्हाला अॅपची गरज आहे परंतु आम्हाला अॅपला आमच्या डेटापर्यंत जाऊ देण्याची इच्छा नाही. हे खासगीपणाचे उल्लंघन आहे. यामुळे ट्रायने याबाबत नियम बनवायला हवेत. अॅपला सर्व डेटापर्यंत का प्रवेश हवा आहे?या लोकांचे हे म्हणणे आहे की, जर आम्ही अॅपचा वापर करू इच्छितो तर त्या अॅपवर आम्ही करीत असलेल्या संवादापर्यंतही अॅपने पोहोचता कामा नये. जर कधी सुरक्षा एजन्सीला गरज भासली तर त्यांनी त्यांच्या सर्व्हरवरून डेटा संबंधित एजन्सीला उपलब्ध करून द्यावा. परंतु तो वाचू नये.एका अधिकाºयाने सांगितले की, लोकांची ही तक्रार नैतिकतेच्या मुद्द्यावर चुकीची नाही. कोणत्याही अॅपला समस्त फोटो, ईमेल, एसएमएस वा कॉन्टॅक्ट लिस्ट कशासाठी हवी आहे? आम्ही हा प्रश्न लोकांसमोर ठेवू. त्याचसोबत तांत्रिक कंपन्या आणि इतर भागधारक किंवा उद्योगाशी संबंधित लोकांशी चर्चा करू. लवकरच सल्लापत्र प्रसिद्ध केले जाईल. याशिवाय अॅपवर या प्रकारची सहमतीबद्दल एक मार्गदर्शन करण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत ट्रायलची लवकरच बैठक होणार आहे व त्यानंत पुढील उपाययोजना होईल, असे अधिकारी म्हणाला.
अॅप डाउनलोडसाठी का हवी फोन, ईमेल लिस्ट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:23 AM