कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहीनबाग येथे सुरु असणाऱ्या आंदोलनावरुन देशातलं राजकारण तापू लागलं आहे. यामध्ये भाजपा नेत्यांकडून वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं. अशातच पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाबाबत बोलताना दिलीप घोष म्हणाले की, दिल्लीमध्ये इतकी भीषण थंडी आहे या वातावरणात शाहीनबाग येथे आंदोलनकर्ते खुल्या परिसरात आंदोलन करण्यास बसलेत. त्यांना काहीही होत नाही. तर दुसरीकडे आमच्या बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीमुळे घाबरलेले लोक आत्महत्या करत आहेत असं ते म्हटले.
दिल्लीत शाहीनबागमध्ये महिला आपल्या लहानमुलांसह आंदोलनासाठी बसले आहेत. यातील कोणी आजारी पडत नाही, कोणी मरत नाही. गेल्या आठवडाभरापासून हे आंदोलन सुरु आहे. मग या आंदोलनासाठी पैसे कुठून येत आहेत असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत एकाही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला नाही याचं आश्चर्य वाटतं. इतकचं नव्हे तर त्यांनी कोणतं अमृत प्यायलं आहे त्यामुळे त्यांना काही होत नाही असंही दिलीप घोष म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला, तरीही कडाक्याच्या थंडीतही आंदोलक महिला मागे हटण्यास तयार नाहीत. उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रयन करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतरही शेकडो महिला एकवटलेल्या आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यघटनेतील मूलभूत हक्कांवरच गदा आणणारा असून, त्यामुळे एकता, स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे सांगत आंदोलक महिला लढा देत आहेत. शंभर मीटरच्या परिसरात बांधलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये या महिला आहेत. काहींची नवजात मुलेही त्यांच्यासोबत आहेत. अनेक महिला घरची कामे करून, तर मुली शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन पुन्हा आंदोलनात सहभागी होतात.आंदोलनामुळे हा कालिंदी कुंज-शाहीनबाग मार्ग महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे दिल्लीतून नॉयडाकडे जाणाऱ्यांची अडचण होत आहे. पोलिसांनी शाहीनबागमधील रस्ता खुला करण्याचे आवाहन आंदोलक महिलांना केले. मात्र, महिलांनी हटण्यास नकार दिला. तेथील एका महिलेने सांगितले की, रस्ता बंद असल्यामुळे आम्हीही त्रस्त आहोत. मात्र, भविष्यात मुलांसमोरील संभाव्य संकट दूर करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत असं या महिलांचे म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Protest : देशद्रोही विधान करणारा जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला अटक
VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ
जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज
‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?; शिवसेनेचा सवाल
पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश