तिरुअनंतपूरमः गेल्या आठवड्यात केरळमधील मलप्पूरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं. अननस खाल्ल्यानंतर हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात वाढणार्या पिलासह तिचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपा खासदार मनेका गांधी यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानंही या प्रकरणात खुलासा केला आहे. त्या हत्तिणीच्या मृत्यूची प्राथमिक चौकशी केली असता फटाके भरलेलं अननस हत्तिणीला खाऊ घालण्यात आलेलं नाही, तर तिनं चुकीनं ते खाल्लं असावं, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे.
हत्तिणीच्या शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूच्या १४ दिवस आधी हत्तिणीने काहीही खाल्ले नव्हते. अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागत होता. त्याचप्रमाणे तिच्या मृत्यूचे मुख्य कारण फुफ्फुसातील पाणी जाणे हे देखील असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसात पाणी शिरल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात रानावनात फिरत होती. या हत्तिणीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिल्याचं सांगितलं जात आहे. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.
हेही वाचा
लॉकडाऊनचा परिणाम! नोकरी गमावली; डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकतोय केळी
CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर
LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर
लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला
लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा
पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ