अमरावतीः देशावर कोरोनाचं संकट असतानाच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती झाल्यानं एकच खळबळ उडाली. या गॅसगळतीत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ३००हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ५ हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. या सर्व प्रकारावर विशाखापट्टणमच्या पश्चिम विभागाच्या एसीपींनी माहिती दिली आहे. 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. त्यामुळे टाक्यांमध्ये आपोआप रासायनिक प्रक्रिया झाली असून, उष्णतेनं ताप निर्माण झाला आणि टाक्यांमधून गळतीला सुरुवात झाली. गॅस गळती झाली तेव्हा लोक गाढ झोपेत होते, असंही त्यांनी सांगितलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक सत्यनारायण प्रधान म्हणाले की, एनडीआरएफ (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या वतीने राबविण्यात येणा-या मदत आणि बचावकार्यात 27 लोकांचा सहभाग आहे, जे औद्योगिक गळती रोखण्यातील तज्ज्ञ आहेत. 80 ते 90 टक्के लोकांना या गॅसगळतीतून वाचवण्यात आलं आहे. अधिका-यांनी सांगितले की, हा प्लांट गोपालापट्टनम भागात आहे. या भागातील लोकांनी डोळ्यांमध्ये जळजळ, श्वास घेण्यात अडचण, मळमळ आणि शरीरावर लाल पुरळ येत असल्याची तक्रार केली. जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद म्हणाले की, गॅसगळतीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे 70 लोकांना उपचारासाठी किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये लोक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसतात.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारत पाकिस्तानविरोधात पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार?; इम्रान खान यांना वाटतेय भीती
दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र
CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार
Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी
Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी
Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या
CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता