शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

कंडोमच्या वापरात भारत मागे का?; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून वास्तव उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 5:39 AM

देशातील 36 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांपैकी 23 राज्यांत कंडोमचा वापर अवघा 10% देखील नाही. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो.

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक

भारतात १० पुरुषांपैकी फक्त एक जण कंडोमचा वापर करतो व गर्भधारणा टाळण्यासाठी १० महिलांपैकी चार जणी नसबंदी करून घेतात असा निष्कर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (एनएचएफएस) काढण्यात आला. त्यावरून भारतीय पुरुष लैंगिक संबंधांमध्ये आवश्यक काळजी घेण्याबाबत, तसेच आपल्या व जीवनसाथीच्या शारिरिक, आरोग्याबाबत किती निष्काळजी आहेत हे दिसून येते. त्या तुलनेत भारतीय महिला स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागृत आहे असे म्हणावे लागेल. ९.५ टक्के पुरुष कंडोमचा वापर करतात तर ३७.९ टक्के महिला नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतात. शहरांमध्ये हे प्रमाण ग्रामीण भागांपेक्षा जास्त आहे.

सर्वाधिक वापर उत्तराखंडमध्येदेशातील ३६ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांपैकी २३ राज्यांत कंडोमचा वापर अवघा १० टक्के देखील नाही. राज्यांपैकी कंडोमचा सर्वाधिक वापर उत्तराखंडमध्ये (२५ टक्के) व केंद्रशासित प्रदेशांत चंदीगढमध्ये (३१.१ टक्के) होतो.  २०१५-१६ व २०१९-२१ या दोन कालावधीतील निष्कर्ष पाहिले तर कंडोम वापरण्याचे प्रमाण निराशाजनक आहे.

पुरुषप्रधान मानसिकतेचा फटकाकंडोम वापरल्याने एड्ससारखे विकार व इतर आरोग्य समस्यांना दूर ठेवता येते याबद्दल लोकांमध्ये खूप जागृती झालेली नाही. त्याशिवाय आपल्या समाजातील पुरुषप्रधान मानसिकता लैंगिक संबंध राखण्यामध्येही डोकावते. त्यामुळे कंडोमचा वापर करणे टाळले जाते. कंडोममुळे नंपुसकत्व येईल असेही अनेकांना वाटत असते. कुटुंब नियोजन करणे ही पुरुषाची नव्हे तर स्त्रीची जबाबदारी आहे अशी विचित्र भावना अजूनही समाजात आहे. तसेच कंडोम वापरणे म्हणजे पुरुषत्वाला आव्हान असाही एक खुळा समज प्रचलित आहे. 

महिलांना सर्वाधिक त्रासलैंगिक संबंधाचे परिणाम महिलांना जास्त भोगावे लागतात. त्यांना गर्भधारणा होते. अनेक मानसिक, शारिरिक प्रश्न उद्भवतात. मात्र ही गोष्ट लक्षात न घेता अनेक पुरुष कंडोमशिवाय लैंगिक क्रिया पार पाडतात. हा महिलांचा एकप्रकारे केलेला छळच आहे. सुरक्षित लैंगिक संबंध, कुटुंब नियोजन याबाबत केंद्र व राज्य सरकारे लोकजागृती करत असली तरी ती अजून प्रभावी होणे आवश्यक आहे. कंडोमचा दर्जा व त्याचे प्रकार यामध्ये गेल्या काही वर्षांत खूप सुधारणा झाली आहे. कंडोमचे विविध फ्लेवर उपलब्ध आहेत. त्याच्या आकर्षक जाहिराती दूरचित्रवाहिन्यांवर दाखविण्याइतका मोकळेपणा आपल्यात रूजत चालला आहे. मात्र तरीही पुरुषांकडून कंडोमच्या वापराचे प्रमाण जितके वाढायला हवे तितके ते नाही याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना नियमांमुळेही वापर कमी२०२० पासून देशात कोरोनाची साथ सुरू झाली असून ती अजून संपण्याची चिन्हे नाहीत. या काळात लागू केलेले प्रतिबंधक नियम, संसर्गाचा धोका आदी तसेच पारंपारिक मानसिकतेमुळे देखील कंडोमचा वापर कमी झाला होता. २०१९-२० या कालावधीत देशात २ अब्ज कंडोम विकले गेले. त्यातून १५२१ कोटी रुपयांची उलाढाल झाली. भारताची एकूण लोकसंख्या लक्षात घेता ही आकडेवारी नगण्य आहे. सोशल मीडिया तसेच डेटिंग अप्समुळे सेक्स हा विषय समाजामध्ये अधिक उघडपणे प्रकटला आहे. मात्र या गोष्टींचा वापर करणारे बहुसंख्य तरूण कंडोमचा वापर करणे टाळतात ही देखील विसंगती आहे. आधुनिक काळाबरोबर जगायचे असेल तर त्यात कंडोम हे देखील महत्वाचे साधन आहे हे विसरून चालणार नाही. कारण त्याच्या वापराने आरोग्य सुरक्षित राहाते.

टॅग्स :Sexual Healthलैंगिक आरोग्य