शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमेरिकी व्हिसाचे शुल्क का वाढत आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 9:03 AM

प्रश्न : अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसाचे  शुल्क किती आहे? नॉन-इमिग्रंट व्हिसाचे शुल्क वाढत आहे का?  उत्तर : अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसा ...

प्रश्न : अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसाचे शुल्क किती आहे? नॉन-इमिग्रंट व्हिसाचे शुल्क वाढत आहे का? उत्तर : अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसा श्रेणीतील शुल्क ३० मे २०२३ पासून वाढणार असून, जगात सर्वत्रच ते वाढणार आहे. नॉन इमिग्रंट व्हिसामध्ये बिझनेस, पर्यटन, ट्रान्झिट (बी१ / बी२ आणि सी१ / डी) आणि पिटिशन नसलेले विद्यार्थी व्हिसा किंवा एक्स्चेंज व्हिसिटर व्हिसा आदींच्या शुल्कामध्ये सध्याच्या १६० अमेरिकी डॉलरवरून १८५ अमेरिकी डॉलर इतकी वाढ होणार आहे. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच ए-१ बी आणि एलएस या पिटिशन आधारित व्हिसाच्या शुल्कात १९० अमेरिकी डॉलरवरून २०५ अमेरिकी डॉलर इतकी वाढ होणार आहे.

प्रश्न : जर मी आधीच शुल्क भरले असेल आणि माझी अपॉइंटमेंट नंतर असेल तर काय होईल? उत्तर : ज्या अर्जदारांनी ३० मे २०२३ च्या अगोदर व्हिसा शुल्क भरलेले आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट जर ३० मेनंतरची असेल तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी व्हिसा शुल्क भरले असेल आणि ३० मे नंतर व्हिसा मुलाखतीसाठी आलात तरी तुम्हाला वाढीव फरक भरावा लागणार नाही.

प्रश्न : व्हिसा शुल्क किती काळासाठी ग्राह्य असते? उत्तर : व्हिसाचे शुल्क ३६५ दिवसांसाठी ग्राह्य धरले जाते. याचा अर्थ व्हिसा शुल्क भरल्यानंतर एक वर्षाच्या आत तुम्ही अपॉइंटमेंट निश्चित करायला हवी. एकदा भरलेले व्हिसा शुल्क परत केले जात नाही. व्हिसा शुल्कासंदर्भातील अद्ययावत माहिती travel.state.gov आणि https://in.usembassy.gov/visas/ इथे पाहता येईल.

शुल्क वाढीची  ही आहेत कारणे

उत्तर : व्हिसा सेवा पुरविण्याच्या प्रत्यक्ष खर्चात जशी वाढ होते, त्याआधारे यू. एस. डिपार्टमेंट ऑफ स्टेट व्हिसाचे शुल्क निश्चित होते. जगभरात कौन्सुलर सेवांमार्फत जे शुल्क जमा होते, त्यावर कौन्सुलर प्रक्रियेचा खर्च चालतो. तसेच नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी प्रत्येक एम्बसी व कॉन्सुलेटमध्ये एक समान शुल्क आहे. अनेक देशांतील लोक आमच्या देशाशी जोडले जात असून, प्रत्येक व्हिसा श्रेणीतील व्हिसासाठी मोठी मागणी आहे. व्हिसा अर्जदारांकडून मिळणाऱ्या पैशांमुळे अधिकाधिक सेवा-सुविधा पुरविणे आम्हाला शक्य होते तसेच व्हिसाचा प्रतीक्षा कालावधीदेखील कमी होण्यास मदत होते. यावर्षी भारतातून १० लाखांपेक्षा जास्त व्हिसा आम्ही देत असून, कोरोना महामारीनंतरचा हा आमच्या कामातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 

टॅग्स :Americaअमेरिका