पणजी : ‘जैका’ प्रकल्पासाठी लुईस बर्जर कंपनीकडून लाच घेताना पाहिलेल्या अधिकाऱ्याला अटक करणाऱ्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाच घेणारे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक का केली नाही, असा सवाल ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या वकिलाने न्यायालयात केला.आनंद वाचासुंदर यांनी पणजी प्रधान सत्र न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान त्यांचे वकील धोंड यांनी हा प्रश्न केला. या प्रकरणात लाचखोरी झाल्याचे गृहीत धरल्यास लाच देणारे आणि लाच घेणारे, म्हणजे लुईस बर्जर कंपनीचे अधिकारी तसेच कामत व आलेमाव हे तिघेही गुन्हेगार ठरतात. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावून सोडून दिले जाते व ज्याने लाच घेताना पाहिले, त्याला अटक करण्यात आली आहे. हे अयोग्य असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. (प्रतिनिधी)
कामत, आलेमाव यांना अटक का नाही?
By admin | Published: August 01, 2015 12:55 AM