‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:44 AM2024-07-30T05:44:18+5:302024-07-30T05:46:08+5:30

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली.

why should not you be disqualified asked supreme court notice to ajit pawar group | ‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर अजित पवार व त्यांचे ४० आमदार यांच्याकडून न्यायालयाने उत्तर मागविले आहे. 

तुम्हाला अपात्र का ठरवू नये? असा प्रश्न नोटिशीत कोर्टाने केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. पक्षांतरविरोधी कायद्यातील तरतुदींचा वापर अंतर्गत असंतोष कमी करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असे नमूद करत राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा ५३ पैकी ४१ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा होता, असे नार्वेकर म्हणाले होते. 

Web Title: why should not you be disqualified asked supreme court notice to ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.