लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर अजित पवार व त्यांचे ४० आमदार यांच्याकडून न्यायालयाने उत्तर मागविले आहे.
तुम्हाला अपात्र का ठरवू नये? असा प्रश्न नोटिशीत कोर्टाने केला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. पक्षांतरविरोधी कायद्यातील तरतुदींचा वापर अंतर्गत असंतोष कमी करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असे नमूद करत राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा ५३ पैकी ४१ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा होता, असे नार्वेकर म्हणाले होते.