शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान
5
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
6
Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,९०० वर
7
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
8
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
9
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
10
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
11
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
12
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
13
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
14
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
16
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
17
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
18
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
20
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह

"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 2:08 PM

शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Narendra Modi On EVM : एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिलं आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या सर्व घटकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी येत्या १० वर्षात देशाला वेगाने विकासाच्या मार्गावर नेऊ, असं म्हटलं आहे. तसेच १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करु शकणार नाही असा टोलाही मोदींनी लगावला. तसेच ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांनाही मोदींनी यावेळी सुनावलं.

लोकसभा निवडणुकीत यावेळी एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळाले आहे. एनडीएने सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत ही कामगिरी केली आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता ज्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुढच्या १० वर्षात नक्की काय करणार याबाबत खुलासा केला आहे. 

विरोधक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते

यासोबत नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला. "४ जूनला जेव्हा निकाल येत होते, त्यावेळी मी व्यस्त होतो. मग मला फोन येऊ लागले. मी कोणाला तरी विचारले की आकडे ठीक आहेत, पण ईव्हीएम ठीक आहेत का ते सांगा. हे लोक (विरोधक) भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. मला वाटले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएमची अंत्ययात्रा काढतील. मात्र ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद  झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील ५ वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसला १०० जागांचा टप्पा गाठता आला नाही

"१० वर्षांनंतरही काँग्रेसला १०० जागांचा टप्पा गाठता आला नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र केल्या तर भाजपला या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या, तितक्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत. मी स्पष्टपणे पाहू शकतो की इंडिया आघाडीचे लोक पूर्वी हळूहळू बुडत होते, आता ते वेगाने बुडणार आहेत, असाही टोला मोदींनी लगावला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसEVM Machineएव्हीएम मशीन