शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणाऱ्याने सांगितले कारण; पाटीदार आंदोलनाची किनार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:58 IST

सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली.

सुरेंद्रनगर : काँग्रेसचे नेता आणि पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल आज सकाळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती. यावरून हार्दिकने भाजपवर आरोपही केला होता. मात्र, या व्यक्तीने कानशिलात मारण्याचे कारण सांगितले असून पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा राग यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस उमेदवारास निवडणूक देण्याचं आवाहन ते मतदारांना करत आहेत. त्यासाठीच, आज सुरेंद्र नगर येथे सभा घेत असताना, स्टेजवरुन चढून एका मध्यमवयस्क व्यक्तीनं हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर, संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, ती व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला आहे.  तसेच पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चोपल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हा कानशिलात मारणारा व्यक्ती महेसाणा जिल्ह्यातील असून त्याचे नाव तरुण गज्जर आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये हार्दिक पटेलने पुकारलेल्या पाटीदार आंदोलनामुळे त्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तरुणची पत्नी गरोदर होती. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. या काळात सर्वत्र जाळपोळ सुरु असल्याने खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हाच मी हार्दिक पटेलला कानफडवणार असल्याचे पक्के केले होते. या माणसाला कोणत्याही प्रकारे वठणीवर आणणार, असे म्हटले आहे. 

अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलच्या आंदोलनावेळी जन्मलेल्या मुलाला औषधे आणण्यासाठी गेलो होतो. यावेळी सर्वत्र बंद होता. तो रस्ते बंद करत होता. जेव्हा वाटेल तेव्हा गुजरात बंद करत होता. कोण आहे तो? तो काय गुजरातचा हिटलर आहे का? पाटीदार आंदोलनामध्ये ठार झालेल्या 14 तरुणांचा हत्यारा असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच हार्दिकला मारतेवेळी तरुण हा त्याच्या काँग्रेसमध्ये सहभागी होण्याविरोधातही ओरडत होता. हार्दिक पटेलने या घटनेनंतर भाषण सुरुच ठेवले होते. यानंतर त्याने पत्रकारांना हे भाजपाचे कृत्य असल्याचे सांगितले होते. तसेच मारहाण करणारा व्यक्ती स्थानिक नसून बाहेरगावचा असल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरातcongressकाँग्रेसGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019