शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:06 AM

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र, या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. आज देशभरात सुमारे ७०० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे. भडकलेल्या जमावानं ट्रेन आणि इतर मालमत्तेला आग लावली आहे. ज्यामुळे पोलिसांना राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ३२५ जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये या योजनेला विरोध वाढताना दिसत आहे. तेलंगणामध्ये देखील हिंसक आंदोलन सुरु आहे. तिथेही एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. 

अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये गदारोळ सुरू असला तरी त्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लष्कराच्या जमीन, जल आणि हवाई दलाच्या तिन्ही शाखांमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येतात. तसेच गेल्या  पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ३७ हजार ४५९ जवानांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निपथ योजनेविरोधात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. 

दरम्यान, बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासन दोषींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याची राजधानी पाटण्यापासून राज्याच्या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या काही कोचिंग सेंटरच्या परिसरात विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याचे उघड झाले आहे.

पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण-

आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. 

४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाक-

आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा