नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय संघटनांमधील सर्व डॉक्टरांना प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) लिहून देताना कारण नमूद करणे अनिवार्य केले आहे.
आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सर्व फार्मासिस्टना औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियमांचे शेड्यूल एच आणि एच-१ काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे आणि प्रतिजैविकांची औषधी दुकानांतून विक्री थांबवावी आणि केवळ पात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच त्यांची विक्री करावी, असे आवाहन केले आहे.