प्रधानमंत्री जन धन योजना सुरू होऊन 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'मोदी आर्काइव्ह' अकाउंटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2014 सालचा आहे. यात PM मोदी 'प्रधानमंत्री जन धन योजना' कार्यक्रमादरम्यान त्यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगताना दिसत आहेत.
या व्हडिओमध्ये पंतप्रधान मोदी सांगत आहेत, "मी माझ्या गावात शाळेत शिकत असताना 'देना बँके'चे लोक आमच्या शाळेत आले होते. ते गुल्लक देऊन पैशांची बचत कशा प्रकारे करावी, हे समजाऊन सांगत होते. यानंतर, आपणही खाते उघडले आणि आपल्यालाही एक गल्लाही देण्यात आला. तो गल्ला कधीच भरला नाही. कारम त्यात मी पैसे टाकू शकेन असा माझा बॅकग्राउंड नव्हता."
"दोन दशकं शोधत होते बँकेचे कर्मचारी" -मोदी पुढे म्हणाले, "खाते उघडले होते, मात्र मी शाळा आणि गावही सोडले होते. पण बँकेचे कर्मचारी मला शोधू लागले. कदाचित ते मला 20 वर्षांपर्यंत शोधत होते. कारण त्यांना माझे खाते बंद करायचे होते. तेव्हा मला समजले की त्या काळात खात बंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात होते. मात्र आता, खाते उघडण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मी याला गरीबांच्या जीवनातील सूर्योदय मानतो."
मोदी आर्काइव्हने हा व्हिडिओ शेअर करत एक कॅप्शनही लिहिले आहे. यात, "पाच दशकांपूर्वी, एका लहान शाळकरी मुलाने बचतीचे महत्त्व समजून बँक खाते उघडले होते. त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की, हे त्याल्या एक अत्यंत महत्वाची शिकवण देईल. बचतीचे महत्त्व दर्शवणारी शकवण.'
कॅप्शनमध्ये पुडे लिहिले आहे, "कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की, मोठे झाल्यानंतरही त्यांच्याकडे बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी साधन नव्हते. अनेक वर्षांपासून खाते बंद असल्याने सिस्टिमने ते एक ओझं समजून बंद करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर 20 वर्षांनंतर त्यांनी स्वतःच ते बंद करण्याचा निर्णय घेतला. या मुलगा कुणी और नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी होते."