जबलपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये 12 जून रोजी 'स्टेट हेल्थ डिपार्टमेंट'मधील उपसंचालक डॉ. शफतुल्ला खान यांच्या झालेल्या हत्या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या हत्येचा कट त्यांच्या पत्नी आयेशानंच चार जणांना सोबत घेऊन रचला होता. हत्येचा रचलेला कट उघड झाल्यानंतर आरोपी पत्नीनं स्वतःच्या बचावासाठी काही मुद्दे पोलिसांसमोर मांडले आहेत. ''पतीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे केवळ पतीचं गुप्तांग कापायचं होते'',अशी धक्कादायक कबुली महिलेनं दिलं. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी ज्या गुंडांची मदत घेतली होती, त्यांनी डॉक्टरांना जीवे ठार केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.
पाच लाख रुपये देण्याचं वचनपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शफतुल्ला खान यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीनं भाची नंदिनी विश्वकर्माची मदत घेतली. डॉ. शफतुल्ला खान यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या पत्नीनं आपल्या भाचीवर गुंड शोधण्याची जबाबदारी सोपवली. यासाठी तिनं 5 लाख रुपये देण्याचंही कबुल केलं. याप्रकरणी आयशा, नंदिनी आणि राजेंद्र या तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.