भोपाळ : आजकाल इंटरनेट स्वस्ताईमुळे जो-तो स्मार्टफोनमध्येच डोकावलेला असतो. गृहीणीदेखिल मोबाईलवरच व्यस्त असतात. भोपाळमध्ये एका व्यक्तीने त्याची बायको सतत स्मार्टफोनमध्ये व्यस्त असल्याने कंटाळून तिचा फोन काढून घेत कॉलिंगशिवाय काहीच सुविधा नसलेला फिचर फोन देण्याचे धाडस केले खरे पण त्याला संसारावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
खरेतर हे प्रकरण स्मार्टफोन आणि सेल्फीवर आधारलेले आहे. यामुळे या व्यक्तीची पत्नी थेट कौटुंबीक न्यायालयात पोहोचली असून पती स्वत: स्मार्टफोन वापरतो व आपल्याला साधा फोन दिल्याने घटस्फोटाची मागणी करत अर्ज केला आहे. यावर त्या व्यक्तीने पत्नी सारखी सेल्फी घेत राहते व यामुळे घरात जेवनच बनवत नाही. यामुळे तिचा स्मार्टफोन काढून घेऊन साधा फोन दिल्याचे म्हटले आहे. य़ा प्रकरणी या महिलेने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र, तेथे काही झाले नाही म्हणून ही महिला कौटुंबीक न्यायालयात गेली आहे. या महिलेने पोटगीचा खर्च मागितला असून पतीने घटस्फोट देण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने त्यांनी काऊंन्सिलिंगचे आदेश दिले होते. तसेच चौकशीमध्ये पती तिला माहेरच्या लोकांशी बोलण्यास देत नसल्याचे समोर आले. तसेच ही महिला माहेरहून हा फोन घेऊन आली होती. मात्र, पतीने तो काढून घेऊन साधा फोन दिला आहे. तर पतीने खुलाश्यामध्ये सांगितले की, पत्नी सारखी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर सेल्फी टाकत बसते. यामुळे घरातल्या सदस्यांना जेवन मिळत नाही. यामुळे आई वडिलांना पाव खावे लागत आहेत.