दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीनंतर आता सीबीआयने त्यांना कथित मद्य घोटाळ्यात अटक केली आहे. बुधवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाल्यानंतर सीबीआयने अधिकृतपणे केजरीवाल यांना चौकशीसाठी परवानगी मागितली. दुहेरी गुन्ह्यांमुळे आता अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होणे कठीण झाले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी मोठा आरोप केला आहे.
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
सुनिता केजरीवाल म्हणाल्या, अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नयेत यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हे सर्व हुकूमशाही आणि आणीबाणीसारखे आहे. आम आदमी पक्षानेही केजरीवाल यांच्या अटकेवर टीका केली आहे.
सीबीआयने बुधवारी कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना औपचारिकपणे अटक केली आणि न्यायालयाकडे ५ दिवसांची कोठडी मागितली.
ईडीने तात्काळ जामिनावर स्थगिती आदेश काढला: सुनीता केजरीवाल
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.२० जून रोजी केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन मिळाला होता पण ईडीकडून तातडीने स्थगिती आदेश काढण्यात आला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “दुसऱ्याच दिवशी सीबीआयने केजरीवाल यांना आरोपी बनवले आणि आज त्यांना अटकही करण्यात आली.केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हा कायदा नाही. ही हुकूमशाही आहे, आणीबाणीसारखी आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षानेही अटकेवर नाराजी व्यक्त केली. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळण्याची शक्यता असताना भाजप अचानक अस्वस्थ झाला आणि त्यांनी त्यांच्यावर ‘बनावट’ गुन्हा दाखल केला. सीबीआयने अटक केली आहे", असं आपने म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांची सीबीआय तिहार तुरुंगात चौकशी करत होती. यानंतर विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या आदेशानंतर सीबीआयने सीएम केजरीवाल यांना अटक केली.