आजकाल विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. नवरा असो वा बायको, लग्नानंतरही लोकांचं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याच्या अनेक केसेस आपण पाहत असतो. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील आग्रा येथूनही अशीच एक घटना समोर आली आहे. एका पत्नीने पतीकडे अजब मागणी केली आहे. ती म्हणते की, तिला आता त्याच्यासोबत राहायचं नाही. ती तिच्या दोन्ही मुलींना आपल्यासोबत ठेवेल आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे. पण खर्च मात्र पतीला करावा लागेल.
पत्नी बॉयफ्रेंडसोबत राहिली तर तिला एक रुपयाही देणार नाही यावर पती ठाम आहे. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. जेव्हा महिलेने तिच्या या अजब मागणीबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. माझा आणि दोन्ही मुलींचा सर्व खर्च पतीने करावा. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे. पण दोन्ही मुली पतीच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खर्चाची जबाबदारी पतीवर आहे असं ती म्हणाली.
यावर पतीने म्हटलं की, जर ती त्याच्यासोबत राहत नाही तर मग पैसे का खर्च करायचे?. जर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत असेल तर तिचा खर्चही त्याने उचलावा. तेव्हा समुपदेशकाने पत्नीला विचारलं, तू असं का करत आहेस? बायको म्हणाली- नवरा अनेकदा कामानिमित्त बाहेर राहतो. तो मला वेळ देऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मला एकटेपणा वाटू लागला.
याच काळात ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि तो आता तिचा बॉयफ्रेंड आहे. पण तिचा बॉयफ्रेंडही आधीच विवाहित आहे. त्याला मुलंही आहेत. तो आधीच त्याच्या कुटुंबाचा खर्च भागवत आहे. अशा परिस्थितीत तो माझा खर्च उचलू शकत नाही. माझा आणि माझ्या मुलींचा खर्च माझ्या पतीने उचलावा अशी माझी इच्छा आहे.
समुपदेशक डॉ. अमित यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. पत्नी हाथरस येथील रहिवासी आहे. पत्नीला आता बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे. ती पतीकडून खर्चाचीही मागणी करत आहे. मात्र पतीला तिचा खर्च करायचा नाही. सध्या दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही. अशा स्थितीत तिला एक तारीख देण्यात आली आहे.