लखनौ - उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या पत्नीला काही लोक फूस लावून पळवून घेऊन गेले होते. त्यानंतर सदर व्यापारी या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार घेऊन गेला. मात्र पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. दरम्यान आरोपी सदर व्यापाऱ्याला वारंवार धमकावत होते. अखेर त्रस्त होऊन हा व्यापारी कोमामध्ये गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या पत्नीला काही लोकांनी फूस लावून पळवले होते. त्यानंतर सदर व्यापारी जेव्हा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेला, तेव्हा पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. दरम्यान, त्रस्त झालेला व्यापारी कोमामध्ये गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील उसावां गावातील एखा व्यापाऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या व्यापाऱ्याचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईकांनी व्यापाऱ्याचा मृत्यूनंतर खूप गोंधळ घातला. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदनही करू दिले नाही. अखेर पोलिसांनी आरोपींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीय शांत झाले.
या व्यापाऱ्याच्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी त्याच परिसरातील काही लोकांनी फूस लावून पळवून नेले. आरोपी या व्यापाऱ्याला धमकावत होते. तसेच त्याला मारहाणही करायचे. हा व्यापारी कुटुंबीयांसह अनेकदा पोलीस ठाण्यात गेला. मात्र काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान पोलिसांनी १५ हजार रुपये लाच घेतली. मात्र तरीही तिच्या वडिलांची तक्रार नोंदवली गेली नाही, असा आरोप मृत व्यापाऱ्याच्या कन्येने केला. या सर्वामुळे व्यापारी मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला होता. त्यानंतर तो कोमामध्ये गेला. तसेच उपचारांदरम्यान दिल्लीमध्येच त्याचा मृत्यू झाला. आता कुटुंबीयांनी या घटनेसाठी ठाण्यातील एसओ आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे.