ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 27 - सेक्सची मागणी करत असलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर पत्नीने लाथ मारल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत उघडकीस आली आहे. कुटुंबीयांनी गुपचूपपणे या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केल्यावर या घटनेची खबर पोलिसांना लागली आणि या प्रकरणास वाचा फुटली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपला पती उदय कुमार हा एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. त्याने कोणतीही खबरदारी न घेता संबंध बनवण्याची इच्छा व्यक्त करत असे. त्याला विरोध केल्यावर आपल्यात भांडण होई. शनिवारी रात्रीही आपल्या पतीने कोणत्याही प्रोटेक्शनशिवाय सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्याला विरोध करताच त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बचाव करत असताना आपली लाथ त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे मृताच्या पत्नीने सांगितले.
दरम्यान, मृत उदयच्या बहिणीने त्याच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या भावाच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध असून, त्याच्यासोबत राहण्यासाठीच तिने उदय याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.