शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

400 जागा आल्यानंतर भाजप संविधान बदलणार? रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:36 AM

कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांना संविधान बदलायचे असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. मात्र, नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही -सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, "मला वाटते हेगडे हे बऱ्याच वेळा दलितांच्या विरोधात अनपेक्षित भूमिका ते मांडत असतात. त्यांच्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. त्यांच्या भूमिकेचा आणि भाजपच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. जेव्हा त्यांची भूमिका लिमिटेड होती. तेव्हा त्यांचे 1982 मध्ये दोनच खासदार होते. अटलजींच्या काळात ते 182 झाले, नरेद्र मोदी यांच्याकाळात 282 झाले, नंतर 303 झाले. आता 370 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हेगडे नेहमीच विपर्यस्त अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि आता संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही." 

...यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही -आठवले म्हणाले, "संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. पण नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे. जसे, आता महिला आरक्षणाचा कायदा झाला. पार्लमेंटच्या प्रत्येक सेशनमध्ये अनेक विधेयकं येत असतात. त्यात नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो. त्यात जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न असतो. तेथे बहुमताने विधेयके मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात. यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही."

जेपी नड्डा यांना पत्र पाठवणार -"हेगडेंच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी मागच्या वेळीही दलितांच्या संदर्भात अशीच विपर्यस्त भूमिका मांडली होती. त्यामुळे आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार, अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मांडणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण जेपी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत," असेही आठवले म्हणाले.

"मला असे वाटते की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत. काही मुद्द्यांवर मतभेद असतीलही. पण एनडीएसोबत जॉर्ज फर्नांडीस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, त्यामुळे मला वाटते की, तसे परिवर्तन समाजात झालेले आहे," असेही आठवले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण