शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:20 IST

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये राहणाऱ्या २५0 भारतीयांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी त्यांना परत आणण्यात येणार आहे. त्यांना आणण्याची परवानगी मिळावी, असे पत्र भारताने चीन सरकारला पत्र पाठविले आहे. त्यानंतर, एअर इंडियाचे ४२३ आसनांचे विमान वुहानलो रवाना होणार होईल. चीनमधून आलेल्या नांदेडमधील एका व्यक्तीला देखरेखीखाली रुग्णालयात ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत भारतात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झाल्याने १0६ जण मरण पावले असून, ४,५00 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. तिथे २५0 भारतीय असून, त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी आहेत. आतापर्यंत १३ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जागतिक आणीबाणी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनमधून थेट वा अन्य देशांच्या मार्गे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे भारतात स्कॅनिंग सुरू असून, आतापर्यंत ३0 हजारांहून अधिक जणांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. केरळमध्ये ४३६ संशयित असून, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्यातील काही जण चीनमधून तर काही कोरोनाचा संसर्ग झालेल्या देशांतून आले आहेत.चीनमधून परतलेल्या आठ जणांना तामिळनाडूतील रुग्णालयात चार आठवड्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. मुंबई व पुणे येथेही सहा संशयित रुग्ण असून, त्यांनाही रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. दिल्लीतही तीन संशयित रुग्णांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे, तर मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील रुग्णालयात एक मुलगा व त्याच्या आईला दाखल केले आहे. ते दोघे वुहानहून भारतात आले आहेत. पंजाबमध्येही एका संशयित रुग्णाला इस्पितळात दाखल केले आहे.ईशान्येकडील राज्यांत अ‍ॅलर्टआतापर्यंत भारतात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, पण परदेशांतून येणाºया भारतीयांची संख्या मोठी असल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेनेही चीनमधील नागरिकांना व्हिसा नाकारला आहे. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून म्यानमारने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. नेपाळमध्येही एक रुग्ण आढळला आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्ये नेपाळ व चीनला लागून असल्याने तिथे अधिक खबरदारीचा अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना