Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:53 PM2024-09-16T15:53:58+5:302024-09-16T15:59:29+5:30
Amit Shah at rally in J-K's Kishtwar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि.१६) राज्यातील किश्तवाडमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले.
Amit Shah at rally in J-K's Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. अशा स्थितीत नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि.१६) राज्यातील किश्तवाडमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले.
यावेळी अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर 'आपल्या कुटुंबाचे सरकार' बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल.
#WATCH | Kishtwar, J&K: Addressing a public rally, Union Home Minister Amit Shah says, "The Congress-National Conference alliance has always nourished terrorism... In the 1990s, Farooq Abdullah was the CM, you were elected after an agreement with Rajeev Gandhi. When the Kashmir… pic.twitter.com/kYTRG0gPnZ
— ANI (@ANI) September 16, 2024
काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही." याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.