शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 20:09 IST

झारखंड निवडणुकीतील पराभवानंतर भाजपात गेलेले चंपाई सोरेन परत झामुओमध्ये जाऊ शकतात.

Jharakhand News : झारखंडमध्ये सत्तेत परतल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) भारतीय जनता पक्षाला (BJP) फोडण्याच्या तयारीत आहेत. जेएमएम निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत असून, या यादीत राज्यातील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे नाव आघाडीवर आहे.

चंपाई सोरेन यांनी निवडणुकीपूर्वी JMM सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हेमंत सोरेन आता ममता बॅनर्जींप्रमाणे आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना परत पक्षात आणण्याची योजना आखत आहेत. 2021 मध्ये बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनीदेखील टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक बड्या नेत्यांना परत आणले होते.

चंपाई सोरेन यांच्या नावाची चर्चा का?चंपाई सोरेन सध्या सेराइकलन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. चंपाई झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि JMM च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. यावेळी आदिवासींसाठी राखीव असलेल्या 28 पैकी केवळ एका जागेवर JMM आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि ती जागा चंपाई सोरेन यांची सरायकेला आहे. भाजपने ज्या आदिवासी जागा मिळवण्यासाठी चंपाई सोरेन यांना पक्षात घेतले होते, त्या सर्व जागांवर पक्षाचा पराभव झाला आहे.

दरम्यान, आता झारखंड निवडणुकीनंतर जेएमएमचे राष्ट्रीय सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी चंपाई सोरेन यांच्या पुनरागमनाबाबत वक्तव्य केले आहे. सुप्रियो म्हणाले की, चंपाई दादांना पक्षात परत यायचे असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्यासाठी झामुमोचे दरवाजे नेहमी खुले असतील.

निवडणुकीदरम्यान एकमेकांवर टीका नाहीनिवडणुकीच्या प्रचारात हेमंत सोरेन आणि चंपाई सोरेने यांनी एकमेकांवर एकदाही टीका केली नाही. इतकंच काय, तर शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या पणतूचा रांचीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणावरुन बाबू लाल मरांडीपासून ते अर्जुन मुंडापर्यंत...अनेकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. पण, चंपाई सोरने यांनी एकही शब्द काढला नाही.

झारखंडच्या राजकीय वर्तुळात चंपाईबाबत दोन चर्चा सुरू 1. झारखंड मुक्ती मोर्चा चंपाई सोरेन यांना राज्यसभेवर पाठवू शकते आणि पराभूत झालेल्या त्यांच्या मुलाला सरायकेलनमधून आमदार बनवू शकते. 2. पूर्वीप्रमाणेच चंपाई सोरने JMM मध्ये सामील होऊन हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये मंत्री बनू शकतात.

टॅग्स :jharkhand assembly election 2024झारखंड विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा