Lakhimpur Kheri Violenceविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे Congressचा फायदा होणार? Prashant Kishore म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:08 PM2021-10-08T13:08:50+5:302021-10-08T13:20:00+5:30
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची परिणती लखीमपूरमधील हिंसाचारात झाली होती. यामध्ये चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence) दरम्यान, लखीमपूरमध्ये घडलेल्या या हिंसाचाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला चौफेर घेरले आहे. लखीमपूर प्रकरणावरून काँग्रेसची आक्रमकता आणि राहुल आणि प्रियंका गांधींची सक्रियता यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा अच्छे दिन येतील, अशी शक्यता काँग्रेसमधील नेत्यांसह अनेकजण वर्तवत आहेत. मात्र राजकीय रणनीतीगार प्रशांत किशोर यांनी ही शक्यता खोडून काढणारे विधान केले आहे. (Will Congress benefit from its aggressive stance against Lakhimpur violence? Prashant Kishor Says Congress will not benefit)
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, लखीमपूरमधील घटनेमुळे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकजूट होईल, असा विचार जे लोक करत आहेत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. दुर्दैवाने देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुळापर्यंत घर केलेल्या समस्या आणि कमकुवत बाजूंबाबत कुठलाही तातडीचा उपाय दिसत नाही आहे.
People looking for a quick, spontaneous revival of GOP led opposition based on #LakhimpurKheri incident are setting themselves up for a big disappoinment.
— Prashant Kishor (@PrashantKishor) October 8, 2021
Unfortunately there are no quick fix solutions to the deep-rooted problems and structural weakness of GOP.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी केलेले हे विधान खूप महत्त्वपूर्ण आहे. २०१४ मध्ये भाजपासाठी रणनीती आखल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रशांत किशोर यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांचा प्रभाव वाढत गेला. तसेच अनेक राजकीय पक्ष प्रशांत किशोर यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी आग्रह करत आहेत.