नवी दिल्ली : इस्लामिक उपदेशक झाकीर नाईकविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि इतर तपास संस्थांनी घेतला आहे. जातीय आणि भडकाऊ भाषणे देणे तसेच इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी झाकीर नाईकविरुद्ध ही कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस, एनआयए किंवा आयबी हे झाकीर नाईकच्या कथित दहशतवादी लिंकबाबत माहिती मिळवू शकलेले नाहीत. तथापि, बांगलादेशमधील दहशतवादी कृत्यातील काही आरोपींनी झाकीर नाईकमुळे प्रभावित झाल्याचे म्हटले होते. तसेच तरुणांना इसिसमध्ये जाण्यास प्रोत्साहित केल्याचेही कोणतेही पुरावे नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील तपास संस्था सध्या झाकीर नाईक यांचे पीस टीव्हीवरील व अन्य भाषणे तपासणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
झाकीरवर गुन्हा दाखल करणार?
By admin | Published: July 22, 2016 4:03 AM